शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तुलना वेस्ट इंडिजच्या खेळाडूशी केली आहे. वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? असा हल्लाबोल भास्कर जाधवांनी बावनकुळेंवर केला होता. याला भाजपा नेते, केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भास्कर जाधव यांचं तोंड उघडलं की गटारगंगा वाहत असते,” अशी टीका केशव उपाध्ये ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून केली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, “भास्कर जाधव यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी तोंड उघडले की गटारगंगा वाहत असते, याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या जवळपास कोणी फिरकत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांना दोन हात दूर ठेवतात. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पक्ष वाढीसाठी सुरू असलेला धुमधडाका पाहून ‘मातोश्री’चे डोळे दिपले असणार आणि भुंकण्यासाठी भास्कररावांचा पट्टा काढला असणार.”

हेही वाचा : “एका बड्या नेत्याचं…”, ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

“तुम्ही भुंकत राहा, दुसरे प्रवक्ते थुंकत राहतील, तुमच्या असल्या शिव्याशापांमुळे आमचा पक्ष जिंकत राहील! काय करणार? गटाराचं तोंड तर धरू शकत नाही!”, असं टीकास्र केशव उपाध्ये यांनी भास्कर जाधव यांच्यावर सोडलं आहे.

भास्कर जाधव काय म्हणाले?

बावनकुळेंनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ‘घरकोंबडा’ म्हणून टीका केली होती. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. मी गेल्यावेळी बावनकुळेंना वेस्ट इंडिजचा खेळाडू बोलल्यावर व्यक्तीगत टीका केली म्हणाले. मग, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का?”

हेही वाचा : “उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका

“वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा,” असा शब्दांत भास्कर जाधवांनी बावनकुळेंना सुनावलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshav upadhye attacks bhaskar jadhav over chandrashekhar bawankule west indies player ssa