शहरातील पुरातन असलेल्या खाकीबाबा मठ संस्थानाच्या १८०० एकर जमिनीचा वाद सोडविण्यास विलंब का झाला, अशी विचारणा करत कारवाईचा अहवाल जुलैपर्यंत सादर करावा, अशी सूचना माहिती आयुक्तांनी महसूल प्रशासनास दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच निर्णय होईल, असा दावा तक्रारकर्ते भाजपचे बी. डी. बांगर यांनी केला आहे.
मठाच्या जमिनीवर काही धनदांडग्यांनी कब्जा करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास काही सरकारी अधिकाऱ्यांचीही साथ होती. मठाच्या मालमत्तेतून काही भूखंडमाफिया खंडणी वसूल करत होते. या अनुषंगाने भाजपच्या बी. डी. बांगर यांनी तक्रार केली. मठाच्या जमिनीचा घोटाळा चार वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. बनावट रजिस्ट्री करून लाखो रुपयांची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनीच ही जमीन विकत घेतली होती. भूखंडातील खरेदी विक्री घोटाळय़ातील प्रमुख आरोपी संजय घोडेकरसह अनेक जण अद्यापही पकडले गेले नाहीत. या अनुषंगाने लोकायुक्तांकडे बांगर यांनी तक्रार केली होती. एप्रिलअखेपर्यंत या अनुषंगाने सुनावणी होईल. तत्पूर्वी महसूल प्रशासनाने निर्णय घेण्यास का विलंब लावला, यासह जुलैअखेपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
या अनुषंगाने २५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे तक्रारीच्या आधारे सुनावणी पार पडली. या सुनावणीत निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तक्रारकत्रे बी. डी. बांगर उपस्थित होते.
खाकीबाबा मठाच्या १८०० एकर जमिनीचा वाद
शहरातील पुरातन असलेल्या खाकीबाबा मठ संस्थानाच्या १८०० एकर जमिनीचा वाद सोडविण्यास विलंब का झाला, अशी विचारणा करत कारवाईचा अहवाल जुलैपर्यंत सादर करावा, अशी सूचना माहिती आयुक्तांनी महसूल प्रशासनास दिली आहे.
First published on: 28-02-2014 at 01:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khaki baba mathland issue do report present commissioner