शहरातील पुरातन असलेल्या खाकीबाबा मठ संस्थानाच्या १८०० एकर जमिनीचा वाद सोडविण्यास विलंब का झाला, अशी विचारणा करत कारवाईचा अहवाल जुलैपर्यंत सादर करावा, अशी सूचना माहिती आयुक्तांनी महसूल प्रशासनास दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच निर्णय होईल, असा दावा तक्रारकर्ते भाजपचे बी. डी. बांगर यांनी केला आहे.
मठाच्या जमिनीवर काही धनदांडग्यांनी कब्जा करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास काही सरकारी अधिकाऱ्यांचीही साथ होती. मठाच्या मालमत्तेतून काही भूखंडमाफिया खंडणी वसूल करत होते. या अनुषंगाने भाजपच्या बी. डी. बांगर यांनी तक्रार केली. मठाच्या जमिनीचा घोटाळा चार वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. बनावट रजिस्ट्री करून लाखो रुपयांची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनीच ही जमीन विकत घेतली होती. भूखंडातील खरेदी विक्री घोटाळय़ातील प्रमुख आरोपी संजय घोडेकरसह अनेक जण अद्यापही पकडले गेले नाहीत. या अनुषंगाने लोकायुक्तांकडे बांगर यांनी तक्रार केली होती. एप्रिलअखेपर्यंत या अनुषंगाने सुनावणी होईल. तत्पूर्वी महसूल प्रशासनाने निर्णय घेण्यास का विलंब लावला, यासह जुलैअखेपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
या अनुषंगाने २५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे तक्रारीच्या आधारे सुनावणी पार पडली. या सुनावणीत निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तक्रारकत्रे बी. डी. बांगर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा