११ गावांतील शेतकऱ्यांचा प्रकल्पासाठी पुढाकार ल्ल नऊ हजार एकर जागेवर नवे शहर वसणार
स्थानिकांच्या विरोधामुळे महामुंबई सेझ आणि दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आले असतानाच खालापूर तालुक्यातील ११ गावांतील शेतकऱ्यांनी ‘स्मार्ट सिटी’ विकसित करण्यासाठी पुढाकार घेत आपल्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी देण्याची तयारी दाखविली आहे.
तब्बल नऊ हजार एकर परिसरात हा प्रकल्प विकसित केला जाईल. त्यासाठी सुमारे आठ हजार कोटींचा निधी अपेक्षित असून याकरिता गुंतवणूकदारांचा शोध सुरू आहे. आपल्या वडिलोपार्जति जमिनींची थेट विक्री न करता शेतकरी एक कंपनी स्थापन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार त्यांना कंपनीत शेअर्स दिले जातील. त्यानंतर या जमिनी विकसित करून त्या निवासी आणि व्यापारी वापरासाठी उपलब्ध करण्यात येतील. यातून कायमस्वरूपी उत्पन्न मिळविण्याचा या शेतकऱ्यांचा प्रयत्न असून या कामी विकासक म्हणून सिडकोने पुढाकार घ्यावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खालापूर तालुक्यातील महड, खालापूर, शिरवली, वढवे, िनबोडे, निघडोली, कलोते(रयती), कलोते (मोकाशी), विणेगाव, वावढळ या गावांतील शेतकरी या प्रकल्पासाठी उत्सुक आहेत. नऊ हजार एकर जागेपकी सहा हजार एकर जमिनीवर खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्प विकसित केला जाईल. यातील ५० टक्के जमीन पायाभूत सुविधांसाठी, तर ५० टक्के जमीन विकासकामांसाठी वापरण्यात येईल. पनवेलनजीक नवी मुंबई विमानतळ आकाराला येणार आहे. या परिसरात मोठी शहरे विकसित करण्याचा आराखडा सिडकोने तयार केला आहे. या पाश्र्वभूमीवर या शेतकऱ्यांनी स्मार्ट सिटी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे जिल्ह्य़ातील मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर हा प्रकल्प बेतलेला आहे.
खालापूर स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सिडकोला सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दुसरीकडे प्रकल्पाला अर्थपुरवठा करण्यासाठी जागतिक बँक आणि एचडीएफसी बँकेसोबत आमची बोलणी सुरू आहेत.
– नवीनचंद्र घटवाल, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समन्वयक
ल्ल ल्ल ल्ल
यापूर्वी या परिसरात अनेक प्रकल्प आले, मात्र त्यांच्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले. आज त्यांची परिस्थिती बिकट आहे. त्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणलेला, कायमस्वरूपी उत्पन्न देणारा स्मार्ट सिटी प्रकल्प आम्हाला शाश्वत वाटतो आहे.
– अनंत पाटील, माजी सरपंच (नडोदे)
गेल्या काही वर्षांत या परिसराचा शैक्षणिक विकास झाला. लोक सुशिक्षित झाले, पण नोकऱ्या मात्र मिळाल्या नाहीत. या प्रकल्पातून अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळतील.
– काशिनाथ पारटे, स्थानिक