वाई: महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन साताऱ्यात साजरा करण्यात येत आहे. खंडाळा पंचायत समिती इमारतीत यशवंतराव चव्हाण पुतळा अनेक वर्षांपूर्वी बसविण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन साताऱ्यात साजरा करण्यात येत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सातारा जिल्ह्यात या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खंडाळा पंचायत समिती इमारतीत यशवंतराव चव्हाण पुतळा अनेक वर्षांपूर्वी बसविण्यात आला आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनादिवशीही परिसर अस्वच्छ होता. पुतळ्याची व परिसराची साफसफाई स्वच्छता करण्यात आली नव्हती.पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला नव्हता. आज शासकीय सुट्टी असतानाही यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिना निमित्त खंडाळा पंचायत समितीकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन न करण्यात आले नव्हते.
आणखी वाचा-सातारा पोलीस अधीक्षकांची अशीही कर्तव्यदक्षता; महामार्गावर वाचवले दोघांचे जीव
सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा खंडाळा पंचायत समिती माजी सभापती नितीन भरगुडे- पाटील स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यासाठी खंडाळ्यातून कराडला जात होते. तत्पूर्वी पंचायत समितीच्या परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते गेले असता तेथे अंत्यत विदारक दृश्य दिसून आले. त्यांनी स्वतः तात्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने पुतळा व परिसराची स्वछता केली. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पंचायत समितीच्या प्रशासनाच्या गलथान कारभारविरोधात पंचायत समिती माजी सभापती नितीन भरगुडे- पाटील यांनी खंडाळा पंचायत समितीच्या प्रशासनावर संताप व्यक्त केला . याबाबत खंडाळा पंचायत समितीचा गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.