चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल, एसटी, ट्रक आणि कार यांचा विचित्र भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील प्रवासी जखमी झाले. तर चारही वाहनांची मोठी हानी झाली.
परशुराम घाटात दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामध्ये एसटी चालक जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पहाणी केली. सुदैवाने या चार वाहनांच्या अपघातात एसटीमधील प्रवासी बचावले आहेत. या अपघातानंतर
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चिपळूनकडून खेडच्या दिशेने येणारी एसटी आणि समोर येणाऱ्या ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये मागून येणारी कार एसटीवर जोरदार आदळल्याने हा मोठा अपघात झाला. एक कारचालक तर यामध्ये दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. तर एसटी चालकही जखमी झाल्याची माहिती आहे. एसटी बसमधून काही लोक दापोलीकडे पर्यटनासाठी निघाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.