जनलोकपाल विधेयक लवकरात लवकर संसदेमध्ये मंजूर करावे, यासाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी बुधवारी भेट घेतली. लोकपाल विधेयक लवकरात लवकर मंजूर न झाल्यास अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या स्वतःही येत्या शनिवारपासून राळेगणमध्येच उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारने आणखी लाजीरवाणी परिस्थिती न ओढवून घेता लवकरात लवकर लोकपाल विधेयक संसदेमध्ये मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी उपोषणस्थळी केली.
जनलोकपाल विधेयक संसदेने तातडीने मंजूर करावे, यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरुवात केली. राळेगणसिद्धीमध्ये ते मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत. अण्णांना पाठिंबा दर्शविण्यासाठी देशभरातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांमुळे राळेगणसिद्धी गजबजून गेले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच लोकपाल विधेयक नक्की मंजूर होईल, असे आश्वासन देत केंद्र सरकारने अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

Story img Loader