Kiran Mane : २०२३ च्या डिसेंबर महिन्यात मालवण या ठिकाणी नौदल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. याबाबत हळहळ व्यक्त होत असून यावरुन आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

विरोधकांकडून सरकारवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचं कारण सांगितलं. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असं सांगितलं आहे.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral
VIDEO : नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रुममध्ये बोलावणाऱ्या उपअभियंत्याला तरुणीने दिला चपलेचा प्रसाद; बघा कशी केली पोलखोल
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचं डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं. हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं”. यानंतर आता किरण माने ( Kiran Mane ) यांनी पोस्ट लिहून या प्रकरणी टीका केली आहे.

काय म्हटलं आहे किरण मानेंनी?

खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुनाही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता. मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वीचा नाही, अगदी परवा-परवा. इलेक्शनच्या चारपाच महिने आधी. राममंदिराच्या दीड महिना आधी. त्यानंतर फक्त २६६ दिवसांत ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते ! असं किरण मानेंनी ( Kiran Mane ) म्हटलं आहे.

यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या..

मोदी यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली. पूल कोसळताना पाहिले. पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या. बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले. रस्ते खचलेले पाहिले. राम मंदिराचा गाभारा गळताना पाहिला. नवीन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला. जगापुढे लाजेने मान खाली जावी अशा या घटना. पण त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली. असंही किरण माने ( Kiran Mane ) म्हणाले.

हे पण वाचा- मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण

त्यांना पनौती वगैरे म्हणतात ते आवडत नाही

त्यांना टीकाकार ‘पनौती’ वगैरे म्हणतात ते मला अजिबात आवडत नाही. एक तर असं कुणाला म्हणणं चुकीचं आहे. पनौती ही अंधश्रद्धा आहे. एकदा दुर्दैवावर गोष्ट ढकलून दिली की आपण यामागचा कारणकार्यसंबंध शोधणं सोडून देतो. नेहरूंच्या काळापासून बांधलेले पुल, रस्ते, इमारती आणि पुतळे सत्तर-पंचाहत्तर वर्षे भक्कम उभे असतात… आणि आजकाल गाजावाजा करत, प्रचार करत हजारो करोड खर्चून, स्पेस टेक्नॉलॉजी वापरून बांधलेलं सगळं एका वर्षाच्या आत पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं, याचं कारण पनौती नसतं. मग काय?

‘भ्रष्टाचार, घोटाळे आणि निकृष्ट बांधकाम.’ बस्स. दुसरं काहीही नाही. पनौती म्हणून हसण्यावारी नेण्यापेक्षा आपण तर्कशुद्ध विचार करूया. हा भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतही होऊ लागला, हे भयानक आहे ! स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षांतल्या भ्रष्टाचाराच्या होत्या-नव्हत्या त्या सगळ्या मर्यादा आज ओलांडल्या गेल्या आहेत. कहर झाला आहे. धोक्याची घंटा आहे ही. भ्रष्टाचार्‍यांच्या विळख्यात संपूर्ण देश जखडला गेल्याचा हा सिग्नल आहे.

अजून तरी होय जागा… तुका म्हणे पुढे दगा !

किरण माने ( Kiran Mane )

अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

Story img Loader