Kiran Mane Post : प्रसिद्ध अभिनेते आणि ठाकरे गटाचे समर्थक किरण माने यांनी जातीधर्मावरून सत्ताधारी पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. “द्वेष करायचाच असेल तर कुठल्या जातीधर्माचा नव्हे, तर माणसामाणसात भेदभाव करणार्‍या कारस्थानी आणि कपटी ‘वृत्ती’चा करा”, अस त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं आहे.

किरण माने म्हणाले की, “उदाहरणार्थ… बदलापूर बलात्कार प्रकरणात फरारी असलेला संस्थाचालक – तुषार आपटे. सोशल मीडियावर एका बाईच्या जाळ्यात अडकून आपल्या देशाची संरक्षणविषयक अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला देणारा देशद्रोही – प्रदीप कुरूलकर. देशातल्या बँकिंग इतिहासातला सगळ्यात मोठा चौदा हजार कोटीचा चुना लावून पळून गेलेला चोर – नीरव मोदी. तीन हजार महिलांवर बलात्कार करून परदेशात मजा मारत बसलेला सत्ताधारी पक्षाचा नेता – प्रज्वल रेवण्णा. शिवछत्रपतींच्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारात सामील होऊन पुतळा कोसळल्यावर लपून बसलेला मूर्तिकार – जयदीप आपटे. बंगालमधील कोलकाता रेप मर्डर केसमधला आरोपी – संजय राॅय. …आणि आपल्या देशाला आणि महिलांना धोका वगैरे आहे म्हणे ‘मुसलमानां’पासून!”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा >> Kiran Mane : “मालवणच्या शिवरायांच्या पुतळ्याला लवून नमस्कार केला होता, पण आता त्यामागचा भ्रष्टाचार..”, किरण मानेंची पोस्ट

“हे काय आहे माहितीये? कृष्णा कुलकर्ण्यासारख्याने गद्दारी करून वार केला की ‘वितभर पोटासाठी’ आणि अफजलखानासारख्या हराम्यानं बगलेत दाबलं की ‘तो मुस्लिम होता म्हणून.’ असा बुद्धीभेद करणं आहे. नीच नराधमांना जातधर्म नसतो! अफजलखान असो वा कृष्णा… औरंग्या असो वा अनाजी… हे सगळे ‘रयतेला’ म्हणजेच कष्टकरी बहुजनांना झुकतं माप देणार्‍या शिवरायांच्या स्वप्नातल्या स्वराज्याचे दुश्मन होते”, असं किरण माने म्हणाले.

“छत्रपतींनी कधीही जातधर्मावरून भेद केला नाही. त्यांचा खोटा जयजयकार करत धर्मद्वेष पसरवणारी ही जी गद्दार पिलावळ आहे, त्यांना या देशातल्या सर्वसामान्य रयतेला गुलाम बनवायचं आहे. या खरंतर छ. शिवरायांच्या शत्रूंच्याच अवलादी आहेत. …म्हणून भावांनो, छत्रपतींना मानता ना? मग द्वेष करायचाच असेल तर कुठल्या जातीधर्माचा नव्हे, तर माणसामाणसात भेदभाव करणार्‍या कारस्थानी आणि कपटी ‘वृत्ती’चा करा”, असा सल्ला किरण माने यांनी दिला.

Story img Loader