भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसेच व्हिडीओच्या चौकशीची मागणी केली. आता यावर स्वत: किरीट सोमय्यांनी लोकसत्ताला प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपण या प्रकरणी सोमवारी (१७ जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्याचं सांगितलं. तसेच ट्वीट करत फडणीसांना पाठवलेलं पत्रही शेअर केलं.

किरीट सोमय्या म्हणाले, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे.”

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना किरीट सोमय्यांनी माझ्याकडून कुठल्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. याबाबत मी फडणवीसांशी बोललो असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांविषयी काय म्हटलं आहे?

“या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार? भाजपाचं राजकारण घाणेरडं झालं आहे. कधी नव्हे ते या गोष्टी समोर येत आहे. २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून राजकारणाचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवलं गेलं आहे. महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली आहे. व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल. मात्र राज्यातल्या सरकारची मानसिकता विचारांना कलंक लावणारी आहे.”

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ काय म्हणाल्या?

“लोकप्रतिनिधी कुठलेही असतील त्यांनी चारित्र्य सांभाळणं आवश्यक असतं. राजकारणी मग तो महिला असो की पुरुष त्याने आपली प्रतिमा जपावी लागते. एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की महिलांवर कायम बोललं जातं की ही अशी आहे आणि तशी आहे. पुरुषांना चारित्र्य नसतं का? हा प्रश्न निर्माण होतो. लोकप्रतिनिधी म्हणून चार लोकांचं प्रतिनिधीत्व करत असतो तेव्हा आपण काय उदाहरण ठेवतो? “असा प्रश्न अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांनी प्रकरणाची चौकशी करावी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सगळ्या व्हिडीओ प्रकरणावर असं म्हटलं आहे की भाजपाचे नेते असलेले किरीट सोमय्या हे अनेक प्रकरणात ईडीकडे अनेक नेत्यांच्या तक्रारी घेऊन गेले आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते आहे असंही आम्ही ऐकतो आहोत. अशा साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या नेत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नैतिकता, परंपरा या सगळ्या गोष्टी कुठे गेल्या? भाजपा हिंदुत्व, संस्कृती, अध्यात्म यावर गप्पा मारते त्याच पक्षाचा नेता आणि त्याचं व्हिडीओ समोर येणं दुर्दैवी आहे असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने याची चौकशी केली पाहिजे.

शिवसेना उबाठाचे नेते वैभव नाईक यांनी काय म्हटलं आहे?

एक बाजू अशी आहे की अशा प्रकारच्या क्लिप ज्या समोर आल्या आहेत. किरीट सोमय्या सातत्याने दुसऱ्यांवर आरोप करत आहेत. अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले. अजित पवारांवर आरोप केले, हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यांच्यावरही अनेक आरोप केले. राष्ट्रवादीच्या अनेक लोकांवरही आरोप केले. राष्ट्रवादी सत्तेत येण्यासाठी डील झालं आहे का? भाजपानेच या क्लिप दिल्या आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्या आहेत? असे प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केले आहेत.

एकनाथ खडसे यांनी या व्हिडीओबाबत काय म्हटलं आहे?

“मी व्हिडीओ पाहिलेला नाही. मात्र हा अश्लील व्हिडीओ आहे असं कळतं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांना बळीचा बकरा बनवलं जातं आहे-सुषमा अंधारे

“जो व्हिडीओ समोर येतं आहे त्यातून कुणाचं शोषण होत असेल तर त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. तसंच काही महिलांनी माझ्याकडेही तक्रारी केल्या आहेत. अधिवेशनाच्या काळातच हा व्हिडीओ कसा समोर येतो? हा प्रश्नही चर्चिला जाणं आवश्यक आहे. किरीट सोमय्यांचं प्रकरण बाहेर निघतं याचा अर्थ नेमका काय? याचा अर्थ असा आहे की भाजपाकडून किरीट सोमय्यांचा बळी दिला जातो आहे. किरीट सोमय्यांना बळीचा बकरा बनवलं जातं आहे” असं आता सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी काय ट्वीट केलं आहे?

आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे:” जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र!

किरीट सोमय्यांची कथित वादग्रस्त क्लिप ही एका मराठी वाहिनीने दाखवल्यानंतर या सगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून येऊ लागल्या आहेत. अधिवेशनातही या सगळ्याचे पडसाद उमटणार यात काहीही शंका नाही.

Story img Loader