Kirit Somaiya Latest Marathi News : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लिल व्हिडीओप्रकरणी राजकारण तापलं आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. विधान परिषदेत आज याविषयी चर्चा झाली. त्यावेळी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही याप्रकरणी टिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीसांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात निवेदन सादर केले. त्या म्हणाल्या की, “सोमय्याप्रकरणी फडणवीसांनी चौकशी जाहीर केली आहे. याप्रकरणात एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. व्हिडीओ ब्लर करून चॅनेल्सवरून घराघरात हे शॉर्ट्स दाखवले जातात. आपल्या घरात मुलं मुली पाहतात. मी विनंती करीन की तुम्ही व्हिडीओ ब्लर करत असला तरीही सगळं कृत्य परत परत दाखवा, व्हिडीओ दाखवत असताना थोडं बंधन ठेवा. पोलिसांच्या चौकशीत या वाहिन्यांनी गोपनिय स्वरुपात माहिती द्यावी. जेणेकरून पीडित महिलेपर्यंत पोहोचणं शक्य होईल.

त्या पुढे म्हणाल्या की, “तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे फार कठीण परीक्षा आहे माझ्यासाठी. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवराना ते बघायला सांगेन. त्या महिलेचे तक्रार आली पाहिजे”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

हेही वाचा >> किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.”

हेही वाचा >> “यापुढे बरंच काही…”, किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर संजय राऊतांचं सूचक ट्वीट

“महिलेची ओळख सांगता येत नाही. तपासासाठी पोलिसांना महिलेची ओळख दिली जाईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून महिलेची ओळख पटवतील. महिलेची ओळख आपण जाहीर करत नाही. त्यामुळे ती जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

“सोमय्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. याची अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

एका वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आणला. एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप सोमय्यांवर केला जातोय. यावरून किरीट सोमय्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी देवेंद्र फडणवीसांना विनंती.