भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यांनी आरोप केल्यानंतर अनेक नेत्यांना तुरुंगवारी घडली. पण किरीट सोमय्या सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडीओ टीव्हीवरून प्रसारीत केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या सदृश्य व्यक्ती पूर्णपणे नग्न होऊन अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पुढे आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार टीका केली. यावर किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झाला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांच्या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे,” असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.

farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा,…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Amol Kolhe On Ajit Pawar
Amol Kolhe : “इलाका तुम्हारा, धमाका हमारा, उद्या तुमच्या मतदारसंघात…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना जाहीर इशारा
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”

हेही वाचा- किरीट सोमय्या VIDEO प्रकरण; शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना, नेमकं काय मागितलं?

कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण जोरदार चर्चेत असताना किरीट सोमय्या यांचं नवं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळ्याबाबत ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले, “आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचं कंत्राट ‘ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी’ला देण्यासंबंधीत फाईलची RTI अंतर्गत तपासणी केली. तसेच MMRCL मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.” या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.

हेही वाचा- आठ तासांचे VIDEOS आणि पक्षातील मराठी महिलांचा छळ; पेनड्राईव्ह जमा करत अंबादास दानवेंचा सोमय्यांवर गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी. ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.