शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मोठ्या नेत्यांचा उल्लेख करत शिवसेनेचा आणखीन एक मंत्री लवकरच ईडीच्या ताब्यात असे अशा आशयाचं विधान केलं आहे. सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं असून यावेळेस त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावांसहीत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सध्या तुरुंगात असणाऱ्या नवाब मलिक व अनिल देशमुख यांचाही उल्लेख केलाय.
नक्की वाचा >> संजय राऊत यांच्या अटकेस कारणीभूत ठरलेलं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?
संजय राऊत यांच्या अटकेसंदर्भात सोमय्या काय म्हणाले?
संजय राऊतांविरोधात २४ तासांमध्ये तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती सोमय्या यांनी दिली. राऊत यांच्याविरोधात तीन खटले आतापर्यंत दाखल करण्यात आलेत. १२०० कोटीचा घोटाळा आणि सपना पाटकर या महिलेशी दुर्व्यवहार आणि धमक्या दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झालाय तर तिसरं प्रकरण म्हणजे प्रोफेसर डॉ. मेहता किरीट सोमय्याच्या मानहानी च्या घटल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, अशी माहिती भाजपाचे नेते असणाऱ्या सोमय्या यांनी दिली.
नक्की वाचा >> संजय राऊतांना ‘ईडी’कडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…”
डावा हातही जेलमध्ये जाणार
“ही वेगळीच दुसरी कुठली तरी चौकशी सुरु आहे. पत्राचाळचा संबंध नाही याच्याशी,” असं म्हटलं जात असल्याचा संदर्भ देत पत्रकाराने प्रश्न विचारला असता सोमय्या यांनी अनेक बड्या नेत्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणारे राऊत जसे तुरुंगात गेले तसा डावा हातही तुरुंगात जाणार असं म्हटलंय.
पाहा व्हिडीओ –
नक्की वाचा >> मोठी बातमी! संजय राऊतांच्या घरात ‘ईडी’ला सापडलेल्या नोटांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव
“संजय राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो सर्वांनी हीच भाषा वापरली. नवाब मलिक असो, अनिल देशमुख असो की संजय पांडे असो सगळ्यांनी हेच म्हटलं होतं. संजय पांडे तुरुंगात आहेत. शरद पवारांचा उजवा हात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. डावा हात अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. उद्धव यांचा उजवा हात संजय राऊत तर गेला, डावा आता अनिल परबचं पण आता…” असं म्हणत सोमय्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना हसत मान हलवून परब लवकरच तुरुंगात जातील अशा इशारा दिलाय.
नक्की वाचा >> राऊतांच्या घरातील नोटांवर मुख्यमंत्री शिंदेचं नाव असल्यावरुन प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या हसत म्हणाले, “मी…”
“अनिल परबांनी त्यांचं बेकायदेशीर हॉटेल तोडलं नाहीय. हा पैसा कुठून आला याचा तपास सुरु आहे. दापोली न्यायालयात अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल झालीय. त्याची फायनल ऑर्डर १७ ऑगस्टला आहे,” असंही सोमय्या म्हणालेत.