दापोलीतील रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, हे रिसोर्ट आता ९० दिवसांच्या आत पाडण्यात येईल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
“अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येईल. यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठेकेदाराची नियुक्ती होईल. ९० दिवसांत अनिल परब याचे साई रिसॉर्ट पाडण्यात येईल”, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा – “…ती बेईमानी नव्हती का?”; मंत्री शंभुराज देसाईंचा अजित पवारांना सवाल!
नेमकं काय आहे प्रकरण?
दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या रिसॉर्टच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती, असा दावा किरीट सोमय्यांचा दावा आहे. दरम्यान, या आरोपानंतर ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सूरू आहे. या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नसून याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांनी दिली होती.