भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधीची कागदपत्रे आज(गुरूवार) ईडी समोर सादर केली. यावेळी कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर काही वर्षांपूर्वी लिलावातून विक्री झाली. सध्या हा कारखाना विक्री नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या खासगी मालकीचा असून सध्या तो ‘जरंडेश्वर शुगर्स’ नावाने चालविला जात आहे. लिलावाच्या वेळी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत कारखान्याची विक्री झाल्याचा आरोप कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा डॉ शालिनीताई पाटील यांनी केला होता. या प्रकरणी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहाराची ‘ईडी’ मार्फत चौकशी सुरू आहे. ईडीने सध्या हा कारखाना जप्त केला असून आयकर खात्याकडून या कारखान्याची चौकशी सुरू आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज ईडीच्या कार्यालयात जाऊन जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधीची कागदपत्रे सादर केली. अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने व अत्यंत कमी किंमतीत ‘गुरु कमोडीटीज’च्या वतीने कब्जा घेतल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तसेच, या विक्री व्यवहारातून कारखान्याच्या सभासदांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

“फक्त जरंडेश्वरचा व्यवहार झालेला नाही, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, सविस्तरच सांगेन”, अजित पवारांनी दिला विरोधकांना इशारा!

जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारांवरून राज्यात मोठा राजकीय वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सातत्याने अजित पवारांना यावरून लक्ष्य केलं जात आहे. अजित पवारhttps://www.loksatta.com/maharashtra/deputy-cm-ajit-pawar-warns-bjp-over-jarandeshwar-sugar-mill-scam-pmw-88-2641304/ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे देखील आरोप करण्यात आले. यावरून आता अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून विरोधकांना थेट इशारा दिला आहे. “राज्यात फक्त जरंडेश्वर कारखान्याचाच व्यवहार झालेला नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगेन”, असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे.

Story img Loader