ठाकरे आणि वायकर परिवारच्या नावावर असलेल्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील १९ बंगल्यांची नोंद बनावट कागदपत्रे तयार करून रद्द करण्यात आली आहे. या बंगले घोटाळा प्रकरणात बानावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही घोटाळा झाल्याचे मान्य केल्याचा दावा सोमैय्या यांनी केला.

हेही वाचा- हृदयद्रावक! रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरुन गेली शेकडो वाहने

Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
shashank ketkar shares post about delayed payment
आधी निर्मात्यांवर आरोप, आता व्यक्त केली दिलगिरी! शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “गैरसमज दूर…”

ठाकरे – वायकर परिवाराची कार्लई येथील या कथीत बंगले घोटाळा प्रकरणाबाबत किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. १२) रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी डॉ. किरण पाटील यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली. त्यानंतर डॉ. किरीट सोमैया पत्रकारांशी बोलत होते.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे असलेल्या जमीनीवरील १९ बंगले आहेत. याची नोंद रद्द करण्यात आली आहे. २०१४ साली रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी कै. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासह विकत घेतली होती. या जागेवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालत आहे. कै. अन्वय नाईक या घरांची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे – वायकर यांच्या नावे करावी यासाठी पाठपूरावा देखील करण्यात आला. ही घरे ठाकरे – वायकर यांच्या नावे देखील झाली. याबाबत मी आवाज उठवल्यानंतर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून २०२२ मध्ये कागदपत्रामंध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घारांची नोंदणी रद्द करून घेतली , असा आरोप डॉ. किरीट सोमैया यांनी केला.

हेही वाचा- “…तर तू फक्त आमदारच राहशील”; राजकारणात येण्यापूर्वीच शरद पवारांनी रोहित पवारांना केलं होतं सावध, ‘तो’ सल्ला आजही ठरतोय कानमंत्र!

आशा प्रकारे कागदपत्रांमध्ये फेरफार करून घरांची नोंदणी रद्द करणे बेकायदेशीर आहे. बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. ग्रमाविकास मंत्री गिरीश महाजन यांची मी दोन दिवसांत भेट घेणार आहे. त्यांच्यशी चर्चा करणार आहे. बनावट कागदपत्र तयार केल्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दखाल करावा अशी मागणी ग्रमाविकासमंत्र्यांकडे करणार आहे. हा गुन्हा शासनाने नोंदवावा, किंवा मी नोदंवावा याबात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी महिती डॉ. किरीट सोमैया यांनी दिली.

Story img Loader