शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यातच आता खासदार संजय राऊत यांनीही आज एक गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिवाय, यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. शिवसेना नाव आणि निशाणीसाठी आतापर्यंत रुपये २००० कोटींचा सौदा झाला. असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. ज्यावर भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिवसेना नाव आणि निशाणीसाठी रुपये २००० कोटींचा सौदा झाला” असे संजय राऊत म्हणतात, मला आशा आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात याचीका करणार आहे, त्यात हा आरोप, माहितीचा उल्लेख करणार.” असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

या ट्वीटसोबत किरीट सोमय्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, “संजय राऊत म्हणतात शिवसेना नाव आणि निशाणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला. उद्धव ठाकरे आपण आणि संजय राऊत जे कोर्टात अपील करणार आहात, त्यात हा आरोप आपण करणार ना? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.”

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात केला हिंदुत्व सोडलं. म्हणून नाव ही गेलं आणि निशाण ही गेलं. आता दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन निघाले आहेत तर नामोनिशाण तरी उरणार का?” असंही किरीट सोमय्या यांनी या अगोदर म्हटलेलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी? –

“माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiyas statement to uddhav thackeray on sanjay rauts 2000 crores transaction allegation msr