शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पावसामुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळणं सोपं होईल, असा दावा सरकारने केला. मात्र, किसान सभेने सरकारचे हे दावे फेटाळत नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, असा आरोप केला. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवलेंनी भूमिका मांडली.

“अटी शर्तींमुळे अतिवृष्टी नुकसान निश्चिती आणखी जटिल”

अजित नवले म्हणाले, “सलग पाच दिवस किमान दहा मिलिमीटर पाऊस झाल्यास त्या परिमंडळामध्ये अतिवृष्टी झाली असे गृहीत धरून भरपाई देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे.”

Shatrughan Sinha on non-vegetarian food ban
Shatrughan Sinha: ‘संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घाला’, शत्रुघ्न सिन्हांच्या मागणीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

“प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही”

“राज्य सरकारने केवळ पाच दिवस, सलग १० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर त्या परिमंडळात लगेच भरपाई दिली जाईल असा सरळ निर्णय घेतला. याच्या जोडीला आणखीही अतिशय जाचक अटी जोडल्या आहेत. हे अटीशर्तींचे सरकार असल्यामुळे घोषणा करायची, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही याची काळजीही घ्यायची हा फडणवीस सरकारचा नेहमीचा कित्ता यावेळीही गिरवण्यात आला आहे,” असा आरोप अजित नवलेंनी केला.

“३३ टक्के नुकसान दिसले तरच भरपाई मिळणार”

नवले पुढे म्हणाले, “सलग पाच दिवस प्रत्येक दिवशी किमान दहा मिली मीटर पाऊस पडल्यानंतर त्याच्या जोडीला मागील दहा वर्षात त्या परिमंडळामध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला असावा लागेल शिवाय त्यानंतर पुढील पंधरा दिवस सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (एन.डी.व्ही.आय) तपासून तो जर वनस्पती स्थिती नुकसानग्रस्त दर्शवित असेल तरच असे परिमंडळ पंचनाम्यासाठी पात्र ठरणार आहे. पंचनाम्यात ३३ टक्के नुकसान दिसले तरच भरपाई मिळणार आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : विदर्भात जैविक शेती मिशनचा शेतकऱ्यांना लाभ किती?

“नव्या निर्णयामुळे भरपाईची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची”

“नव्या निर्णयामुळे प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनविण्यात आली आहे. नुकसान निश्चितीसाठी गाव हे एकक न ठेवता परिमंडळ एकक ठेवण्यात आल्यामुळे पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावात पाऊस झाला नाही व त्याच परिमंडळातील इतर गावात अतिवृष्टी झाली तरीही इतर गावे मदतीपासून वंचित राहणार आहेत. शिवाय आपल्याकडील पर्जन्यमापक यंत्रांची स्थिती पाहता यानुसार येणारे रिडींग किती विश्वासार्ह मानायचे हाही प्रश्नच आहे. नव्या पद्धतीमुळे जटिलता वाढविण्यात आली असून शेतकरी मदतीपासून आणखी दूर लोटले गेले आहेत”, असा आरोप नवलेंनी केला.

Story img Loader