शिंदे गटातील आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप जात असताना आरोप करणाऱ्यांनी एकतर माफी मागावी, नाहीतर त्यांना न्यायालयात खेचू असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिला होता. त्याला ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – “मला नोटीस पाठवण्याआधी त्यांनी एकच सांगावं की…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल!
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
”खोक्यांचा विषय जेव्हा विधानसभा अधिवेशावेळी गाजत होता, तेव्हा शंभूराज देसाई म्हणाले होते, ‘तुम्हाला खोके हवेत का?’ अशी अनेक विधाने आहेत, या विधानानंतर खोके घेतल्याचा आरोपांना पुष्टी मिळते. त्यामुळे विजय शिवतारेंना माझं सांगणं आहे की, लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिले आहेत. मात्र, तुम्ही आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार असाल, तर हे पुरावे आहेत”, असे प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
हेही वाचा – ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार
दरम्यान, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे आमदार-खासदार मुख्ममंत्री आणि अनेक मंत्र्यांना भेटत असताना असा गौप्यस्फोट करणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांनाही प्रत्युत्तर दिले. “जर आमदार खासदार त्यांना भेटत असतील, तर हरकत नाही. उद्धव ठाकरेंनी कोणालाही अडवले नाही. ज्यांना जायचं आहे, त्यांनी जावे, हे २० जून रोजी उद्धव ठाकरे यांनी संगितले होते. याचा अर्थ आताही कोणी जाणार असतील, तर त्यांना कोणी थांबवणार नाही”, असे त्या म्हणाल्या.