भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये ६ गाळे (सदनिका) हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपानंतर पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपानंतर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून माझा या सदनिकांशी काहीही संबंध नाही. येथील एका जरी गाळेधारक माझा या सदनिकांशी संबंध आहे, असे म्हणाला तर मी स्वत: या गाळ्यांना टाळं लावते, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत. तसेच एका सामान्य महिलेला नाहक त्रास दिला जात आहे. माझा येथील न्यायव्यवसस्था, पोलीस आणि भारतीय संविधानावर विश्वास आहे, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

आज मी टाळं आणि चाव्या सोबत आणले आहे. या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांचा संबंध आहे, असा एक जरी गाळेधारक म्हणाला, तर मी स्वत: त्या गाळ्यांना टाळं मारते आणि आणि मी माध्यमांकडे चावी देते. या महाराष्ट्रात काय चाललंय. राज्यात इतर अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक ठिकाणी घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे, असे पेडणेकर म्हणाल्या. तसेच तुम्हीच तेवढे दूध के झुले आहात का? असा खोचक सवालही पेडणेकर यांनी केला.

हेही वाचा >>> किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर आता किशोरी पेडणेकर आक्रमक, म्हणाल्या “जेरीस आणण्याचा डाव असेल तर…”

मी लोखंडे साहेब म्हणजेच सीईओ यांना फोन केला होता. सात दिवसांत गाळ्यासंदर्भात निर्णय द्यावा लागेल, असे मी त्यांना म्हणालेले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी संवेदनशील आहेत, असं वाटत आहे. एका सामान्य महिलेला त्रास दिला जात आहे. उद्या मला निवडणूक लढायची असेल तर येथूनच लढणार आहे. या लोकांना मी कोण आहे, याबाबत माहिती आहे. मी कशी वागते याबाबत येथील लोकांना कल्पना आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा >>> आता महाराष्ट्रातही वैद्यकीय शिक्षण मिळणार मराठीतून, सरकारची मोठी घोषणा

भाड्याने राहणे हा गुन्हा होता का? दहावेळी बिऱ्हाड बदलणे शक्य नव्हते. जेव्हा आम्हाला आमच्या जुन्या घराचा ताबा मिळाला, तेव्हा आम्ही आमच्या जुन्या घरात गेलो. किरीट सोमय्या शिकलेले आहेत. असे विधान करून ते त्यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अगोदर बोलायचं आणि नंतर गायब व्हायचं, असे त्यांनी करू नये. त्यांना या प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणून दाखवावी. माझा न्यायव्यवस्थेवर, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> “महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा”, टाटा-एअरबस प्रकरणावरून भाजपा आमदाराची मागणी

तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काहीही करायचं का? किरीट सोमय्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात.भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते भाजपामध्ये सामील झालेले आहेत. मग ते सगळेच नेते स्वच्छ झाले का? अनिल परब, संजय राऊत यांच्यानंतर आता मला टार्गेट केले जात आहे, असा आरोपही पेडणेकर यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar said ready to face inquiry regarding worli sra scam criticizes kirit somaiya prd
Show comments