मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक रामदास कदम यांनी रत्नागिरीमधील दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशाच आता शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांनी केलेलं विधान हे माँ साहेबांचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी हे विधान केलं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…”

किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी, “रामदास कदम यांनी टीका केली होती की उद्धव ठाकरे हे नक्की बाळासाहेबांचा मुलगा आहेत का” असं म्हणत प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना, “हे इतकं घाणेरडं आहे. ज्या माँच्या हातचं खाल्लं आहे त्या माँच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत,” असं मत किशोरी पेडणेकर यांनी नोंदवलं.

नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

“हे अतिशय वाईट आहे. मरण पावलेल्या दोन्ही व्यक्तींबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. मुलगा आहे म्हणणे गैर नाही. जसं आपण गर्व से कहो हम हिंदू है म्हणतो तसं गर्व से कहो ये हमारा बाप है म्हणणं चुकीचं आहे?” असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला. शिंदे गटातील नेत्यांना लक्ष्य करताना किशोरी पेडणेकर यांना, “तुमच्या बापाच्या नावावर कधी लढले नाही. लढले तर शिवसेना पक्षप्रमुखांच्याच नावावर लढले. ते जर म्हणत असतील (त्यांच्या वडिलांबद्दल) तर तुम्हाला का टोचतं?” असा प्रश्न विचारला.

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

“हो ते दहा नाही, शंभर नाही हजार वेळा सांगतील. बाळासाहेबांचा बाणा वगैरे सगळं आहे. पण त्याचबरोबर संयमी नेतृत्व आहे हे माँचं आहे. हे सांगणं चुकीचं आहे का? ही माझी आई, हे माझे वडील असं सांगणं चुकीचं आहे का? तुम्ही हे असं नाही सांगू शकत,” असं पेडणेकर यांनी म्हटलं.