Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपाने १४८ जागा लढवून तब्बल १३२ जागा जिंकल्या. साहजिकच भाजपाचा स्ट्राइक रेट आणि मतदानाची टक्केवारी ही इतर सर्व पक्षांपेक्षा अधिक आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या पक्षांच्या मतदानाची टक्केवारी घसरली. मतमोजणीची सुरुवात झाल्यानंतर महायुतीने आघाडी घेतली. तर मविआ शेवटपर्यंत पिछाडीवरच राहिली.

हे वाचा >> Live: विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा एका क्लिकवर

महायुतीला किती मतदान मिळालं?

पक्षटक्केवारीएकूण मतदान
भाजपा२६.७७१,७२,९३,६५०
शिवसेना (शिंदे)१२.३८७९,९६,९३०
राष्ट्रवादी (अजित पवार)९.०१५८,१६,५६६
काँग्रेस१२.४२८०,२०,९२१
शिवसेना (ठाकरे)९.९६६४,३३,०१३
राष्ट्रवादी (शरद पवार)११.२८७२,८७,७९७
मनसे१.५५१०,०२,५५७
नोटा०.७२४,६१,८८६
एमआयएम०.८५५,५०,९९२
समाजवादी पक्ष०.३८२,४७,३५०

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी मतदान

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सर्वात कमी मतदान मिळाले आहे. अजित पवारांच्या पक्षाने ५९ पैकी ४१ जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना केवळ ९.०१ टक्के मतदान मिळाले आहे. तर शरद पवार गटाचा स्ट्राइक रेट सर्वात कमी (११.६२ टक्के) असूनही त्यांना ११.२८ टक्के मतदान मिळाले आहे.

पक्षाचे नावजिंकलेल्या जागा
भारतीय जनता पार्टी१३२
शिवसेना (शिंदे)५७
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)४१
शिवसेना (ठाकरे) (SHSUBT)२०
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (कांग्रेस)१६
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)१०
समाजवादी पार्टी (एसपी)
जन सुराज्य शक्ति (जेएसएस)
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी (RSHYVSWBHM)
राष्ट्रीय समाज पक्ष (RSPS)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (CPI(M))
शेतकरी कामगार पक्ष (PWPI)
राजर्षि शाहू विकास आघाडी (RSVA)
अपक्ष (IND)
एकूण२८८

मुख्यमंत्री कोण होणार?

महायुतीच्या या घवघवीत यशानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्कंठा आहे. बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे आपलाच मुख्यमंत्री असावा, अशी भाजपच्या तमाम नेत्यांची भूमिका असली, तरी महायुतीचे नेते तसेच भाजपचे केंद्रीय नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांना किती आणि कोणती खाती मिळणार, याची चर्चाही सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी:

Story img Loader