Assembly Election Political Party Vote Share: महायुतीच्या ‘या’ पक्षाला सर्वात कमी मतदान, तर मनसेला मिळाली ‘फक्त’ इतकी मते?
Assembly Election Political Party Vote Share: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडीची मतदानाची टक्केवारी चांगलीच घटली.
विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतदान मिळालं?
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
भाजपाने १४८ जागा लढवून तब्बल १३२ जागा जिंकल्या. साहजिकच भाजपाचा स्ट्राइक रेट आणि मतदानाची टक्केवारी ही इतर सर्व पक्षांपेक्षा अधिक आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या पक्षांच्या मतदानाची टक्केवारी घसरली. मतमोजणीची सुरुवात झाल्यानंतर महायुतीने आघाडी घेतली. तर मविआ शेवटपर्यंत पिछाडीवरच राहिली.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सर्वात कमी मतदान मिळाले आहे. अजित पवारांच्या पक्षाने ५९ पैकी ४१ जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना केवळ ९.०१ टक्के मतदान मिळाले आहे. तर शरद पवार गटाचा स्ट्राइक रेट सर्वात कमी (११.६२ टक्के) असूनही त्यांना ११.२८ टक्के मतदान मिळाले आहे.
मुख्यमंत्री कोण होणार?
महायुतीच्या या घवघवीत यशानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्कंठा आहे. बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे आपलाच मुख्यमंत्री असावा, अशी भाजपच्या तमाम नेत्यांची भूमिका असली, तरी महायुतीचे नेते तसेच भाजपचे केंद्रीय नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांना किती आणि कोणती खाती मिळणार, याची चर्चाही सुरू झाली आहे.