महाविद्यालयीन जीवनात अनेक विद्यार्थ्यांना रॅगिंगला सामोरे जावे लागते. रॅगिंगचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुढे सरसावली असून, कोकण रॅगिंगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तसेच रॅगिंगला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी मनविसेकडे तक्रार करण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष राजेश कोळी यांनी  केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष राजेश कोळी यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली रॅगिंगमुक्त कोकण अभियान मनविसेतर्फे राबविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रॅगिंगला सामोरे जावे लागते, त्या विद्यार्थ्यांनी प्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे तक्रार करावी.
तक्रारग्रस्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न्याय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांनी मनविसेकडे तक्रार करावी, असे आवाहन राजेश कोळी यांनी केले आहे. रायगड जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे ८५५१८५९३९३. शालोम पेणकर ९८६०६५५३४३, राकेश पाटील ९८१९३५१७१७, उपजिल्हाध्यक्ष प्रणय पाटील ९४०३६१००. रत्नागिरी जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांंनी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी ९४२२६२७९०९ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विद्याथ्यार्ंनी जिल्हाध्यक्ष अमित इब्राहीमकर ९४२२०५६३८४ यांच्याशी संपर्क साधावा. मनविसेच्या या अभियानाचे मनसेचे रायगड संपर्कप्रमुख गोवर्धन पोलसानी तसेच रत्नागिरी संपर्कप्रमुख वैभव खेडकर यांनी स्वागत केले आहे.

Story img Loader