कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एव्हीएच केमिकल कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱया स्थानिक नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. प्रकल्पाविरोधात राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर पोलिसांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. मोर्चेकऱयांना जिल्हाधिकाऱयांना निवेदन द्यायचे होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यास नकार दिला. त्यानंतर मोर्चेकऱयांपैकी काहीजण दुसऱया मार्गाने आत शिरले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.
कोल्हापूर ‘बंद’ला मोठा प्रतिसाद
कोल्हापूरातील टोल आकारणीविरोधात पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला सोमवारी मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी सकाळी दुचाकीरॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे ५०० दुचाकीचालक सहभागी झाले होते. टोल आकारणीविरोधात मंगळवारी शहरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एव्हीएच केमिकल कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱया स्थानिक नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-05-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur activist ransacked collector office over avh chemical project issue