कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला रात्री पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना बसला आहे. पाणी साचल्याने ऊसतोड थांबली आहे. उसाचे उभे पीक जमीनदोस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला रात्री अवकाळी पावसाने झोडपले. ग्रामीण भागात धुवाधार पाऊस पडत राहिला. याचा जबर फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे नुकसान झाले. उसाच्या फडामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. काही ठिकाणी तळ्याचे स्वरूप आल्याने ऊसतोडणी यंत्रणा जागीच थांबली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी रस्त्याशेजारील ऊसतोडीकडे मोर्चा वळवला आहे.
हेही वाचा…Sharad Pawar: “मी १४ निवडणूक लढलो, कधीही पराभव नाही; पण यावेळी…”, शरद पवारांचं निकालावर मोठं विधान
ॉ
पावसामुळे गुऱ्हाळ घरे चालवण्यावर परिणाम झाला आहे, असे चालकांचे म्हणणे आहे. चिखलामुळे ऊसतोड यंत्रासह वाहन उसाच्या फडात जाऊ शकत नाही. तोडलेला ऊस डोक्यावरून वाहून नेण्यासाठी मजुरांना जादा पैसे द्यावे लागतात. चिखलात जेसीबी यंत्रणेची मदत देण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.