लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. गुरुवारी सकाळीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी त्यांना अटक केली होती. माळवी स्वतःहून एसीबीच्या कोल्हापूरमधील कार्यालयात हजर झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला होता. कायद्यासमोर सर्वजण समान असल्याचे न्यायाधीश के. डी. बोचे यांनी निर्णय देताना स्पष्ट केले. १६ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तृप्ती माळवी व त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गडकरी यास अटक झाली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली होती. गुन्हा दाखल झालेल्या दिवशी रात्र असल्यामुळे माळवी यांना तांत्रिक कारणामुळे अटक केली नव्हती. तथापि त्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढला. दुस-या दिवशी त्यांना मोरया इस्पितळात दाखल करण्यात आले. पक्षाच्या पदाधिका-यांनी इस्पितळात भेट घेऊन माळवी यांचा महापौरपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर माळवी यांचे अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू राहिले.
कोल्हापुरच्या महापौरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
अटकेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या महापौर रूग्णालयात दाखल
कोल्हापूरच्या महापौरांना जामीन, अटक व सुटका एकाच दिवसात
लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.
First published on: 05-02-2015 at 10:41 IST
TOPICSतृप्ती माळवी
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur mayor trupti malvi arrested released on bail