सावंतवाडी : किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर कोल्हापूर येथील खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी बुधवारी रात्री राजकोटला भेट देत पाहणी केली. यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि  दुःख देणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नाही ती येथे घडली आहे. ही घटना का घडली? कोणामुळे घडली. कशामुळे घडली. याचा विचार व्हावा. याला जे जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हायलाच हवी. आज मी येथे येऊन पाहणी केल्यानंतर संपूर्ण बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून आले. त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे,ठाकरे शिवसेनेचे बाबी जोगी व इतर उपस्थित होते.