कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूक इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून न लढण्याचा निर्णय माजी वस्त्रोद्योग मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांनी आज जाहीर केला. मात्र याचवेळी त्यांनी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. यापूर्वी दोन वेळा लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केलेले राहुल आवाडे आता यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात ताराराणी पक्षांच्या झेंड्याखाली उतरतील हे स्पष्ट झाले आहे.

प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षामध्ये तीस वर्षांहून अधिक काळ काँग्रेसचे राजकारण केले. त्यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा सांगत प्रकाश आवाडे हे १९८५ साली प्रथम आमदार झाले. त्यानंतर ते पाच वेळा आमदार बनले. त्यांना तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रकाश आवाडे यांनी विधानसभेची निवडणूक ताराराणी पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर आवाडे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दर्शवला. सध्या ते भाजपचे समर्थक असले तरी आगामी विधानसभा निवडणूक ताराराणी पक्षाच्या वतीने अपक्ष म्हणून लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर आता विधानसभा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे त्यांनी स्वतःच घोषित करत घराण्याच्या राजकीय वारशाची सूत्रे कनिष्ठ पुत्र राहुल आवाडे यांच्याकडे सोपवली आहेत.

raj thackeray rally in thane
सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन ; राज ठाकरे
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका

हेही वाचा – Nawab Malik : महायुतीने नाकारलेल्या नवाब मलिकांना अजित पवारांची साथ? एक्स पोस्टमुळे चर्चेला उधाण!

आज ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी नगराध्यक्षा  किशोरी आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहुल आवाडे, त्यांच्या पत्नी मोश्मी आवाडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांच्यासह ताराराणी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, महिलांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

महायुती अन्यथा अपक्ष

याप्रसंगी आमदार आवाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार आवाडे यांनी विधानसभेसाठी इचलकरंजीतून राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत केले. महायुतीकडून तिकीट मिळाले तर सन्मानाने स्वीकारू. पण तिकिटासाठी कोणाकडे जाणार नाही, असेही आवाडे म्हणाले. आवाडे यांनी स्थापन केलेल्या ताराराणी पक्षाच्यावतीने निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’, सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, “त्या दिवशी…”

शिरोळ, हातकणंगलेत उमेदवार

आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी आघाडीचे शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात उमेदवार असतील, असेही सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार नसलो तरी राजकारणात सक्रीय राहणार असल्याचेही प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केले. शिवाय ज्या पक्षातून बाहेर पडलो तिथे परत जाण्याचा विषयच नाही, असे  सांगत त्यांनी काँग्रेसपासून लांब असल्याचे स्पष्ट केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केले आहेत लोकांचा संपर्क आहे. यामुळे विजय आपलाच आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.