महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कोल्हापूर टोलमुक्त केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या संदर्भात पत्रकार बठकीचे आयोजन केले होते. या वेळी टोल संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, कोल्हापूर टोल मुक्तीसाठी रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकनाची समिती नेमली आहे. या समितीमध्ये टोलविरोधी कृती समितीचा सदस्यही घेतला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत ११ ऑगस्ट रोजी मुंबईत मूल्यांकन समितीची बैठक होईल. बैठकीस कृती समितीचे नेते, सदस्यही उपस्थित राहणार आहे. बैठकीत आयआरबीला मूल्यांकनानंतर निश्चित केलेली रक्कम सांगितली जाईल. यावर कंपनीचेही म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर योग्य त्या चच्रेनंतर कंपनीला किती पसे द्यायचे हे निश्चित होईल. महापालिका जरी पसे देणार असली, तरी त्यासाठी शासन महापालिकेला निधीची मदत करणार आहे. तसेच कंपनीचे पसे कसे द्यायचे याबाबत योग्य त्या पर्यायांचाही विचार होईल, असेही मंत्री पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.