कोल्हापूर : शेतकरी आणि सैनिक यांचे महत्त्व कथन करणाऱ्या देशकरी या कोल्हापुरातील लघुपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर ओटीटीसह विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. फिल्मफेअरच्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील पाटील यांचा मधुबाला हा लघुपट होता.
लघुपटाने ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून आणखी १५ ठिकाणी नामांकन मिळालेले आहे. कथा, दिग्दर्शन, निर्माते संजय देव आहेत. पटकथा वैभव कुलकर्णी यांची असून छायांकन विक्रम पाटील यांचे आहे. ईश्वर मालगावे यांचे संगीत आहे. राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे त्याचे चित्रीकरण झाले असून कलाकार आणि तंत्रज्ञ स्थानिक आहेत.
हेही वाचा…कोल्हापुरात मंत्रिपदासोबतच पालकमंत्रिपदाचीही स्पर्धा
कोल्हापुरचा झेंडा
फिल्मफेअर पुरस्कारावर पाचव्या वेळी कोल्हापूरच्या कलाकारांचा झेंडा फडकला आहे. १०१८ उमेश बगाडे – अनाथ, २०१९ सचिन सूर्यवंशी – सॉकर सिटी. २०२० रोहित कांबळे – देशी, २०२२ सचिन सूर्यवंशी – वारसा , २०२४ – देशकरी.