रत्नागिरी : कोकणात कधी ही या, कोकणच्या सौंदर्यात भरच पडलेली दिसते. ७५० किमी समुद्रकिनारा लाभलेला कोकणभूमी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. परमेश्वराने आपल्याला दिलंय त्याकडे आपलं लक्ष नाही. फक्त पर्यटनावर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. तुम्ही कल्पना केली नसेल इतके सुंदर कोकण होऊ शकते. तुम्हाला गाव सोडावं लागणार नाही. मात्र चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिली, ज्यांनी स्वतः काही केले नाही. आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांचे अनेक फार्म हाऊस झाली, कोकणात उद्योगधंदे नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे निघून जातात, म्हणून कोकण मागे पडले. पण तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सगळे इथेच मिळेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुहागर येथील जाहीरसभेत सांगितले.

गुहागर येथे मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची सभा घेण्यात आली, त्यासभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, परदेशात ज्याप्रकारे समुद्रकिनारे विकसित झालेले पाहतो, पण परमेश्वराने हे कोकणाला दिले मग आपल्याकडे का होत नाही, चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिली, ज्यांनी स्वतः काही केले नाही. आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांचे अनेक फार्म हाऊस झाले. कोकणात उद्योगधंदे नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे निघून जातात. विदर्भ, मराठवाडा सगळीकडे हेच. दर ५ वर्षांनी निवडणूक येते, आज किती वर्ष आपण त्याच त्याच विषयावर निवडणूक लढवणार आहोत, प्रत्येकजण सांगतो, रोजगार आणू मग आतापर्यंत का आणला नाही. निवडून दिलेल्या आमदारांना तुम्ही प्रश्न विचारत नाही. इथली माणसं मुंबई, पुण्यात का जातात, हे का विचारले जात नाही असे राज ठाकरेंनी म्हटले.

ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

आणखी वाचा-“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!

केरळात जा, अख्खं राज्य पर्यटनावर सुरू आहे, तिथे कुठे रिफायनरी आली. पर्यटनावर गोवा राज्य सुरू आहे. इतकं सुंदर कोकण करता येईल. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ना तुम्हाला घर सोडावे लागेल, ना गाव सोडावे लागेल, तालुका सोडावा लागेल, तुम्हाला जे काही असेल इथेच मिळेल. आतापर्यंत हे का झाले नाही, कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच पक्षांना निवडून देता. तुम्ही खासदार, आमदार निवडून देता, दिल्लीत खासदार कोणते प्रश्न मांडतात, कोकण पर्यटनावर किती प्रश्न मांडले गेले. कोकणाचा कॅलिफोर्निया करू असं राजकारणी बोलत होते, पण त्याचे पुढे काय झाले. आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल. राज ठाकरे हा ओरडून तुम्हाला सतत सांगतोय, तुम्ही महाराष्ट्राचे नागरीक आहे. ज्याचा इतिहास एवढा मोठा, स्वाभिमानी कणा राज्याचा मोडून टाकला. आपल्याला काही दुःख नाही. आज तुम्ही असे वागता, म्हणून हे राजकारणी असे वागतात. तुमचा विचार नाही, राज्याचा विचार नाही. काय उद्योग आपल्याकडे आले पाहिजे याचा विचार नाही. फक्त राजकारणात गुंतले गेलेत.

५ वर्ष तुम्ही तमाशा बघताय, इथला पक्ष तिथे जातो, तिथला पक्ष इथे येतो, हे आमदार विकले जातात वैगेरे हे ५ वर्ष तुम्ही पाहताय. एकेकाळी पत्रकार, संपादकांना राजकारणातील लोक घाबरायचे. एक भीती असायची, आता कुणाबद्दल राजकारण्यांना भीती उरली नाही. जनतेची भीती नाही मग पत्रकारांना का घाबरणार, उन्हातान्हात तुम्ही रांगेत उभं राहून त्याच त्याच लोकांना मतदान करणार मग ते का घाबरतील. माणसे जिवंत आहेत की पुतळे आहेत हेच कळत नाही. नुसते जाताय आणि मतदान करताय, आमचा जो काही प्रदेश आहे, त्यात तुम्ही काय केले हे विचारावे वाटत नाही. तुम्ही थंड बसला आहात, तुम्हाला स्वतःला विकास म्हणजे काय हे माहिती नाही. तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुम्ही त्याच त्याच गोष्टी ऐकून मतदान करता, नेमका विकास म्हणजे काय असतो हे निवडणूक झाली कि मी तुम्हाला इथं येऊन दाखवणार आहे. नाशिकमध्ये आम्ही जे काम केले, तिथे लोकांना आता मनसेला मत न देऊन चुकल्यासारखे वाटतंय, नाशिकमध्ये आमच्या ५ वर्षाच्या काळात ना त्याच्या आधी काम झाले होते, ना आता कुणी करत आहे. आमचा कोकणचा रस्ता १७-१८ वर्ष झाली, सुरूच आहे. आम्हाला राग येत नाही. काही वाटत नाही. दरवर्षी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे रस्त्यावरील खड्डे पडलेले दाखवतात. नाशिकमध्ये रस्त्यावर खड्डे पडलेत का ते बघा.

आणखी वाचा-Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

कोकणातील रस्त्यांबाबत नितीन गडकरींना मी फोन केला. इतकी वर्ष रस्त्याचे काम होत नाही, वाहतूक कोंडी होते, खड्यांमुळे लोकांना त्रास होतोय, तुम्ही महाराष्ट्रातले, आमचा रस्ता चांगला का होत नाही विचारले, तेव्हा ते म्हणाले, कंत्राटदार पळून गेले, कंत्राटामध्ये टक्केवारी होते, त्याच्याकडे पैसे उरले नसतील. अनेक कारणे असतील पण रस्ता झाला नाही. मात्र विकास काय असतो हे एकदा राज ठाकरेंच्या हाती सत्ता देऊन बघा, केरळ, गोवा सगळ्यांना मागे टाकून आपण पुढे जाऊ, इतकी ताकद कोकणात आहे. कोकणात पक्ष बदलावे लागतील, माणसे बदलावी लागतील. त्याच त्याच लोकांना मत देऊन तुमच्या हाती काय लागणार नाही, असं कळकळीचे आवाहन राज ठाकरें यांनी यावेळी केले.

Story img Loader