कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे १४ वे कोकण मराठी साहित्य संमेलन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत श्री. ना. पेंडसे साहित्य नगरी, दापोली, जिल्हा- रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी दिली.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. काव्यसंमेलन, परिसंवाद, ग्रंथदिंडी, बालधम्माल, काव्याष्टक, व्याख्यान असे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
७ डिसेंबर : स. ८ ते १० – ग्रंथदिंडीचे उद्घाटन- न्याय. भास्करराव शेटय़े व अरुण नेरुरकर, स. १० ते १०.३० – लोकमान्य टिळक ग्रंथदालनाचे उद्घाटन, डॉ. मंडलिक रंगदालन : रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन, गोनीदा चित्र- छायाचित्र दालनाचे उद्घाटन, स. १०.३० ते १.०० उद्घाटन सोहळा, दु. १.०० ते २.०० – भोजन, दु. २.०० ते ३.०० पानिपतकार विश्वास पाटील यांचे ‘कोकण भूमीची ऐतिहासिकता’ या विषयावर व्याख्यान, दु. ३.०० ते ५.०० – श्री. ना. पेंडसे स्मृती कादंबरी लेखनस्पर्धेचा निकाल व पुरस्कारप्रदान सोहळा, ‘मराठी कादंबरीचे समकालीन वास्तव’ या विषयावर परिसंवाद, अध्यक्ष – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सहभाग- प्रा. चंद्रकांत भोंजावळे, रवींद्र लाखे, डॉ. ज्योतिका ओझरकर, सायं. ५.०० ते ६.००- कोकणच्या गजाली, सहभाग : मोहन भोईर, सई लळित, मोहन पाटील, सुधीर शेठ, सायं. ६.०० ते ९.००- उधाण निमंत्रितांचे कविसंमेलन, अध्यक्ष : डॉ. प्रा. प्रभा गणोरकर, रात्री १० ते ११.३० काव्याष्टक, सहभाग- रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं. शिंदे, संभाजी भगत, सौमित्र, अरुण म्हात्रे, नीलेश पाटील, महेश केळुसकर आणि संमेलनाध्यक्ष अशोक नायगावकर.
८ डिसेंबर : स. ९.३० ते १०.३० बाल धम्माल, सादरकर्ते : संदीप सुवरे आणि फ्रेंडशिप दापोलीचे बालकलाकार, अध्यक्ष- माधव गवाणकर, विशेष उपस्थिती- सूर्यकांत मालुसरे. स. १० ते ५.००- अखंड काव्यहोत्र. १०.३० ते ११.४५- सप्तसूर माझे, संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संवाद, स. ११.४५ ते १.१५- मराठी भाषेतील शिक्षण- सद्य:स्थितीची आव्हाने या विषयावर चर्चा, बीजभाषण : डॉ. सागर देशपांडे, चर्चिक : नमिता कीर, रेणू दांडेकर, विनिता ऐनापुरे, अध्यक्षीय भाष्य : अविनाश धर्माधिकारी दु. १.१५ ते २.१५- भोजन, दु. २.३० ते ३.३०- चरित्रकार धनंजय कीर स्मरणयात्रा, सहभाग : डॉ. सुमती कीर, जयू भाटकर, डॉ. प्रा. अनंत देशमुख, दु. ३.३० ते सायं. ५.०० गाजलेल्या बातम्या- काही अनुभव, सहभाग- राजीव खांडेकर, नितीन केळकर, मिताली मठकर, शशिकांत सावंत, राजेंद्र साठे, दिनेश केळुसकर, राजेश पोवळे, युवराज मोहिते, सतीश कामत. सायं. ५.०० ते ५.३०- चहापान, सायं. ५.३० ते ८.३०- निमंत्रितांचे कविसंमेलन, अध्यक्ष : विष्णू सूर्या वाघ, रा. ८.३० ते ९.३०- भोजन, रा. ९.३० ते ११.००- आठवणीतले ‘श्री. ना.’ या विषयावर संवाद- सहभाग- पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, अनिरुद्ध पेंडसे, शशी पेंडसे, प्रा. अशोक चिटणीस, संवादक- विनायक बाळ, प्रा. शांता सहस्रबुद्धे, डॉ. विद्या शिंदे.
९ डिसेंबर : स. ९.३० ते ११.३०- ‘समुद्र जैवविविधता आणि कोकण किनारपट्टीवरील लोकजीवन’ या विषयावर महासंवाद, वारा फोफावला दर्या उफाळला, अध्यक्ष- कॅप्टन सुधीर नाफडे, सहभाग- दिलीप भाटकर, भाऊ काटदरे, विनय महाजन, विजय देसाई, रफिक नाईक, डॉ. अर्चना गोडबोले, पंढरीनाथ तामोरे. स. ११.३० ते दु. १.००- अभिनेत्री, गायिका फैयाज यांची मुलाखत. दुपारी २.०० ते ५.०० समारोप सोहळा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा