सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन येत्या शनिवार दि.२२ मार्च रोजी  सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सावंतवाडी संस्थानचे अधिपती बापूसाहेब महाराज साहित्य नगरीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत एक दिवसीय संमेलन होत आहे

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी शाखेच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय साहित्य संमेलनासाठी  कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांची विशेष उपस्थिती होत आहे.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दर्जेदार साहित्याची मेजवानी असणारे सावंतवाडी संस्थानकालीन शहरात हे संमेलन होत आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी असे या साहित्य नगरीला नाव देण्यात आले आहे अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ,जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी येथे या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक साहित्यिक कवी ग्रंथालय तसेच सर्व स्तरातील व्यक्तीं यांनी या  संमेलन मध्ये सहभागी व्हावे  यासाठी व कार्यक्रम नियोजनासाठी सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे साहित्य संमेलन संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे असे त्याने स्पष्ट केले. या संमेलनाच्या नियोजन आढावा बैठकीसाठी कार्याध्यक्ष श्री ढवळ आले होते. यावेळी पर्णकुटी विश्रामगृहावर घेतलेला पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.

येत्या शनिवार दि .२२ मार्चला एक दिवसीय साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री ,आमदार दीपक केसरकर, संमेलनाचे अध्यक्ष वस्त्रहरणकार प्रा गंगाराम गवाणकर तर विशेष उपस्थिती संस्थापक अध्यक्ष पद्मश्री अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षा सौ नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर यांच्यासहित मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य संमेलन होणार आहे.

या निमित्ताने ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक कै जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त पुस्तक प्रदर्शन,परिसंवाद तर कवी कै वसंत सावंत यांच्या स्मरणार्थ कवी संमेलन, समारोप असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद च्या केंद्रीय सदस्या सौ उषा परब, इतिहासकार प्रा. जी ए बुवा, कुडाळ तालुकाध्यक्ष सौ वृंदा कांबळी, जिल्हा खजिनदार भरत गावडे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, सह सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सदस्य ऍड. नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, प्रा रुपेश पाटील,विनायक गावस आदी उपस्थित होते.

Story img Loader