कोकण रेल्वेची वाहतूक सध्या उशिराने सुरु आहे. मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस वीर स्थानकावर रखडली असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वीर स्थानकानजवळ एक्स्प्रेस बंद पडली आहे. सकाळी चार वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
मुंबईकडे येणारी कोकण कन्या एक्स्प्रेस रात्री ३ वाजून ११ मिनिटांनी वीर रेल्वे स्थानकाजवळ बंद पडली. एक्स्प्रेस बंद पडली असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. एक्स्प्रेसमधील प्रवासी पाच तासांहून अधिक खोळंबले आहेत. एक्स्प्रेसमधील बिघाड दुरुस्त करुन सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. मात्र याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून वाहतूक उशिराने सुरु आहे.