हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे कोकणात मुसळधार पाऊस पडत असून चिपळूण जवळील परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. परिणामी मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. प्रशासनाने वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत असून दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाने महामार्गावरील वाहतूकीसोबतच रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गातील चिपळूण-खेड मार्गावरील रुळावर माती पसरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूकीवर परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे तब्बल तीन ते चार तास उशिराने धावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in