मुंबईहून केरळकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसचे चार डबे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पेणजवळ घसरल्याने कोकण रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कोकण रेल्वेमार्गावरील ३३ प्रवासी व मालवाहू रेल्वेगाडय़ा अडकून पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
निझामुद्दीनहून एरनाकुलमला जात असलेली मंगला एक्स्प्रेस पनवेलहून दुपारी १२च्या सुमारास पेणच्या दिशेने निघाली. पण पेण स्थानकाजवळील पॉइंट ३२ येथे गाडीचे शेवटचे चार डबे रूळांवरून घसरून दुसऱ्या बाजूच्या रूळांवर गेले. या घटनेनंतर तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. घसरलेले चार डबे गाडीपासून वेगळे करण्यात आले व त्यातील प्रवाशांना उर्वरीत डब्यात घेऊन मंगला एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी केरळकडे रवाना झाली. रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी सेटडाऊन रिपेअर्स हाती घेण्यात आले आहे. येत्या १० ते १२ तासांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पेण स्थानकाच्या स्टेशनमास्तर पी. एन. मीना यांनी  दिली.  
या दुर्घटनेचा मोठा फटका कोकण रेल्वेच्या वाहतुकीला बसला. मडगावहून दिव्याला जाणारी पॅसेंजर गाडी चिपळूण येथे रद्द करण्यात आली. त्यामुळे चिपळूण स्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. या गाडीतील प्रवाशांना मागून आलेल्या मांडवी एक्स्प्रेसमधून मुंबईकडे रवाना करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा