अलिबाग : कोकण रेल्‍वे मार्गावरील कोलाड स्‍थानकाजवळ गेटमनची गोळया झाडून हत्‍या करण्‍यात आली. चंद्रकांत कांबळे असे त्‍याचे नाव असून तो तेथून जवळच असलेल्‍या महाबळे गावचा रहिवासी आहे. गोळीबाराच्‍या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला आहे. हल्‍लेखोर आणि हत्‍येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : १० ड्रोन कॅमेरे, गस्ती पथके… ; चोख बंदोबस्तात शिराळ्यात प्रतीकात्मक नागपूजा

पोलीस घटनास्‍थळी पोहोचले असून त्‍यांनी घटनेचा पंचनामा सुरू केलाय. महाबळे ग्रामस्‍थ घटनास्‍थळी पोहोचले असून ते आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही, अशी भूमिका त्‍यांनी घेतली आहे. भर दिवसा गोळीबार झाल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.