रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पेडणे मालपे बोगद्यामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी पहाटे पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने येथील रेल्वे वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्याचे मार्ग बदलण्यात येत आहेत. गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.

कोकणात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोंकण रेल्वेला मोठ्या प्रमाणांत पडला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवार दि. ९ रोजी दुपारी ३.४५ वाजल्यापासून रेल्वे गाड्या ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. मालपे टनेल मधील पाणी आणि चिखल काढण्याचे काम युध्दपातळीवर करुन मार्ग मोकळा करण्यात आला होता. मंगळवारी रात्री उशिरा अडकलेल्या सर्व गाड्या मार्गस्थ करण्यार आल्या होत्या. कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ९ ते १० तास उशिराने गाड्या धावत होत्या.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेही वाचा…“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

पेडणे गोवा मालपे या ठिकाणी गतवर्षी देखील असा प्रकार घडला होता. रेल्वे रूळावर खालून पाणी येत असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या. तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मालपे टनेलमधील पाणी आणि चिखल काढल्या नंतर अडकलेल्या गाड्या मार्गस्थ झाल्यावर बुधवारी पहाटे पुन्हा पाणी या टनेलमधे पाणी भरले आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्याचे मार्ग बदलण्यात येत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमधे रेल्वे क्रमांक १२४४९ मडगांव -चंढीगड एक्सप्रेस, रेल्वे क्रमांक १२६२० मंगलुरु – लोकमान्य टिळक, रेल्वे क्रमांक १२१३४ मंगलुरु- मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस, रेल्वे क्रमांक ५०१०७ सावंतवाडी-मडगांव पेसेजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतून दि. ९ रोजी रात्री सोडण्यात आलेल्या रेल्वे गाडी क्रमांक २०१११ मुंबई-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस आणि रेल्वे क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक -मंगलुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकापर्यत सोडण्यात येऊन तिथून या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे बाबत अधिक माहिती मिळावी, या प्रवाशांच्या सुविधेसाठी ०८३२-२७०६४८० हा दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.