कथित एल्गार परिषद-माओवादी संबंधप्रकरणी २०२० सालापासून तुरुंगात असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम नवलखा यांची सुटका करण्यात आली आहे. नवी मुंबईतील राहत्या घरात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी शुक्रवारी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना मुंबईतील तळोजा कारागृहातून घरी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा >>> ‘भारत जोडो यात्रे’त सावरकरांचा मुद्दा काढणे गरजेचे होते का? नाना पटोलेंनी मांडली भूमिका, म्हणाले “६० रुपये पेन्शन…”
गौतम नवलखा एप्रिल २०२० पासून तुरुंगात आहेत. पुण्यातील एल्गार परिषदेत कथित प्रक्षोभक भाषण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये गैतम नवलखा यांचे नाव आले होते. त्यांच्यावर शहरी नक्षलवादाचे आरोप आहेत. नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते. मात्र नवलखा नजरकैदेत राहणार असलेल्या नवी मुंबईतील जागेच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी प्रश्न उपस्थित केला होता. याच कारणामुळे त्यांची कारागृहातील सुटका लांबली होती.
हेही वाचा >>> आधी आदित्य ठाकरे म्हणाले “…म्हणून टेंडर रद्द केले का?” आता नितेश राणेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले “उद्धव सेनेतील युवराजांची…”
एनआयएने केला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या बुधवारी (१६ नोव्हेंबर) उपस्थित राहिल्या होत्या. तसेच त्यांनी नवलखा यांच्या हमीदार म्हणून उपस्थित राहिल्याचे न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयानेही त्यांना नवलखा यांची हमीदार म्हणून मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर नवलखा हे नवी मुंबईतील ज्या घरात नजरकैदेत राहणार आहेत, त्या जागेच्या सुरक्षेबाबत एनआयएतर्फे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच या जागेच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे, तोपर्यंत नवलखा यांना तळोजा कारागृहातून नवी मुंबईतील घरात हलवण्यात येऊ नये, अशी विनंती एनआयएने केली होती. न्यायालयानेही त्याची दखल घेऊन नवलखा यांना तेथे नजरकैदेत ठेवणे योग्य होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मात्र आता नवलखा यांची कारागृहातून सुटका करण्यात आली असून त्यांना नवी मुंबईतील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात येईल.