अहिल्यानगर : एका शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून शहराच्या उपनगरात असलेल्या एका महाविद्यालयाच्या प्राचार्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष सुधाकर देवरे (रा. तिसरा मजला, आदित्य कॉम्प्लेक्स, ओयसिस शाळेसमोर, उदयनराजेनगर, केडगाव, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचार्य देवरे हा ९ वर्षीय पीडित मुलाला वेळोवेळी अभ्यासासाठी स्वतःच्या घरी बोलवायचा. अभ्यासाच्या नावाखाली मुलाचा लैंगिक छळ करायचा. हा प्रकार २४ जानेवारीपासून सुरू होता. याबाबत कोणाला काही सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकू, अशी धमकी त्याने या शालेय विद्यार्थ्याला दिली होती. घाबरलेल्या पीडित मुलाने घरी पालकांना याबद्दल काल, शनिवारी माहिती दिली. विद्यार्थ्याच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच प्राचार्य देवरे फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करत आहेत.