दमदार पावसामुळे शनिवारी कोयनेसह राज्यातील अनेक धरणांनी पाण्याची अपेक्षित पातळी गाठली असून, आज सकाळी सात वाजता कोयना धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उघडण्यात आले. कोयना धरणाची पाण्याची एकूण साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून आतापर्यंत हे धरण १०४. ७२ टीएमसी इतके भरले आहे. कोयना धरण परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाला असून, अद्याप पावसाचा जोर कायम आहे. काहीशा उशीरानेच राज्यात दाखल झालेल्या पावसाने सुरूवातीला सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, त्यानंतर सातत्याने आणि दमदार हजेरी लावत पावसाने ही तूट भरून काढली आहे.
आतापर्यंत राज्यातील प्रमुख धरणांतील पाण्याची स्थिती पुढीलप्रमाणे: पाणीसाठा टीएमसीमध्ये- (टीएमसीमध्ये)- कोयना -१०४. ७२, धोम – १२.७८, कण्हेर- ९.९७, दुधगंगा -२५.०४, राधानगरी ८.२२ , तुळशी ३.४७, कासारी २.७७, पाटगाव ३.७२, धोम बलकवडी ४.०८, उरमोडी ९.६८, तारळी ५.२९, अलमट्टी १२२.८३.
दमदार पावसामुळे कोयनेसह राज्यातील धरणे तुडूंब भरण्याच्या मार्गावर
दमदार पावसामुळे शनिवारी कोयनेसह राज्यातील अनेक धरणांनी पाण्याची अपेक्षित पातळी गाठली असून, शनिवारी सकाळी सात वाजता कोयना धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उघडण्यात आले. कोयना धरण्याची पाण्याची एकूण साठवणक्षमता, १०५.२५ टीएमसी असून आतापर्यंत हे धरण १०४. ७२ टीएमसी इतके भरले आहे.
First published on: 06-09-2014 at 11:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyna dam doors opens up