Kudal Assembly Constituency: ठाकरे गटाचे वैभव नाईक हॅट्रिक साधणार की निलेश राणे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे नेते वैभव नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

Vaibhav naik Nilesh rane
Kudal Assembly Constituency: कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे सामना रंगणार? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेना ( ठाकरे) पक्षाचे नेते वैभव नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. वैभव नाईक हे २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो.

नारायण राणेंचा पराभव

कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे त्यांच्या आक्रमक भाषण शैली व कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी २००९ मध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेल्या नारायण राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा वैभव नाईक यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काढला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा पराभव केला. नारायण राणे यांना पराभूत करणारे वैभव नाईक त्यावेळी जायंट किलर ठरले होते. या निवडणुकीत नाईक यांना ७०५८२ मते, तर राणे यांना ६०२०६ मते मिळाली होती.

maharashtra assembly election 2024 raj thackeray rally in pune
‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
digras assembly constituency shiv sena shinde sanjay rathore vs congress manikrao thackeray maharashtra assembly election 2024
लक्षवेधी लढत:राठोड-ठाकरे दोन दशकांनंतर समोरासमोर
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

हेही वाचा : Mumbra Kalwa Vidhan Sabha Constituency : राष्ट्रावादीच्या बालेकिल्ल्यात कडवी झुंज, जितेंद्र आव्हाड विजयी चौकार लगावणार?

त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे समर्थक असलेले अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांचा पराभव केला. या निवडणुकीत नाईक यांना ६९१६८ मते मिळाली तर देसाई यांना ५४८१९ मते मिळाली.

वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे?

भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २६ हजार २३६ इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यंदा वैभव नाईक यांच्यासमोर महायुतीचे आव्हान आहे. निलेश राणे यांनी भाजपाकडे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती.

हेही वाचा : Teosa Vidhan Sabha Constituency : यशोमती ठाकूर यांच्यासमोर आव्हान कोणाचे ?

महायुतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळणार होता. त्यामुळे हा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले होते. निलेश राणे हे धनुष्यबाण की कमळ यापैकी कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत स्पष्टता नव्हती. परंतु, आता निलेश राणे यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करत उमेदवारी देखील मिळवली आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. निलेश राणे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्याने आता निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना रंगणार आहे.

मालवणमधील शिवपुतळा कोसळल्याचे राजकारण

कुडाळ विधानसभा मतदारसंघात मालवण तालुक्याचा समावेश होतो. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारला धारेवर धरले. पुतळा उभारताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाईक यांनी केला. वैभव नाईक यांची या प्रकरणी आक्रमक भूमिका कुडाळमधील राजकीय वारे बदलू शकेल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kudal assembly constituency will nilesh rane gets ticket from mahayuti to contest against vaibhav naik css

First published on: 06-10-2024 at 20:52 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या