कुडाळ नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार रंगतदार बनला आहे. केंद्र व राज्यात सत्तेत युती असणाऱ्या भाजपा-शिवसेना पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. मनसे काही जागावरच रिंगणात असून प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली असून, राष्ट्रवादीने अवघ्या दोन जागांवर समाधान मानले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी प्रचारात उतरली आहे. राणे यांच्यासह माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणेदेखील या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आहे. भाजपा व शिवसेना युती कुडाळ नगर पंचायत निवडणुकीत झालेली नाही, दोन्ही पक्ष स्वबळाची ताकद दाखवत आहे. शिवसेनेकडे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे बळ तर भाजपाकडे कल्याण-डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी अध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांचे बळ आहे. शिवसेना आणि भाजपा केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी असूनही कुडाळ नगर पंचायत निवडणुकीत स्वबळावर लढत आहे. मनसेने मोजक्या जागी उमेदवार उभे केले असून, प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर व जिल्हाध्यक्ष धीरज परब मनसेच्या विजयासाठी प्रचारात उतरले आहेत. काँग्रेस, भाजपा व शिवसेना अशा तिरंगी लढतीत १७ जागांसाठी सुमारे ७० उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीची नगर पंचायत करून पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे नगर पंचायत आपापल्या पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ुडाळ नगर पंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा एक भाग म्हणून लिंबूची करामत करण्यात आल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत रंगतदार प्रचार सुरू आहे.

Story img Loader