राजकीय अस्तित्वासाठी सामाजिक अस्मिता पेटण्याचे संकेत

कोकणातील कुणबी समाजाने दापोलीत आज क्रांतीचा एल्गारह्ण करत समाजाचं राजकीय आस्तित्व निर्माण करण्याची शपथ नव्याने अधोरेखित केली. यावेळी ‘मिशन २०१९’ डोळ्यासमोर ठेऊन लढाईसाठी सज्ज व्हा, असे आवाहन अनेक मान्यवरांनी केल्याने आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांत सामाजिक अस्मितेची मशाल पुन्हा एकदा पेटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या मेळाव्याला कोकणातील पाचही जिल्ह्यातील कुणबी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
dragon farming in konkan maharashtra dragon fruit farming
लोकशिवार : कोकणात ड्रॅगनची शेती
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

दापोलीतील जॉली क्लब मदानावर आज कुणबी समाजोन्नती संघाच्या युवक मंडळातर्फे एकजूट, आरक्षण आणि राजकारण या विषयावर कुणबी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, काँग्रेस नेते व नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, राष्ट्रवादी नेते व दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकांत बकर, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदिप राजपुरे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक गोिवद जोशी तसेच कुणबी मंडळाचे शरद भावे, माधव कांबळे, दिपक गोरीवले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनेक मान्यवरांनी एकजूटीने संघर्ष करून आपले हक्क मिळवण्याची आणि राजकीय आस्तित्व सिद्ध करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी श्री. लाड यांनी सांगितले की कुणबी समाज एकजूट होऊ नये, म्हणून तीन टक्के लोकांचा आटापिटा सुरू आहे. त्यामुळेच अजून कुणबी वाडय़ांमध्ये पाणी आणि रस्त्याचेच प्रश्न कायम आहे. कोण आपल्याला वापरतोय, हे आता लक्षात घ्यायला हवे. आपण स्वतला छत्रपतींच्या कुळातील म्हणवतो, पण आज इतरांचे चाकर झालो आहोत. स्वतचे राज्य आणायचे असेल, तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, असे सांगतानाच त्यांनी समजाचा लोकप्रतिनिधीच कोणत्याही निवडणुकांत निवडून द्यायला हवा, असे आवाहन केले.

कुणबी मंडळाचे दिपक गोरीवले, माधव कांबळे यांनीही समाजाच्या मर्यादा लक्षात आणून देत राजकीय आणि सामाजिक विकासासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदिप राजपुरे यांनी सांगितले की देव्हाऱ्यात आपण तलवारी उपसलेल्या देवतांची पूजा करतो, पण प्रत्यक्षात स्वत मात्र तलवारी म्यान करून वावरतो. हा विरोधाभास लक्षात घेऊन नशीबावर नाही, तर स्वकर्तृत्वावरच स्वतला सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मात्र या राजकीय आस्तित्वाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक कर्तव्यांना अधिक महत्त्व दिले. मुठी आवळून प्रश्न सुटत नाहीत, मुठीमागच्या मनगटात ताकद यावी लागते. मुळात नेतृत्वाने योग्य दिशा द्यायला हवी. ध्येयापर्यंत पोचता आलं नाही, तर आंदोलनं अपयशी ठरतात. अशी आंदोलनं आणि अपयश द्रष्टय़ा समाजधुरीणांना अपेक्षित नसतात. सध्या आयुधाने संघर्ष करायची वेळ नाही. प्रत्येकाने फक्त स्वतची जबाबदारी योग्य रितीने पाळली, तरीविकासाची लढाई जिंकता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रत्नागिरीत चलता फिरता दवाखाना

  • रायगड जिल्ह्यामध्ये वॉकहार्टच्या मदतीने आपण स्वतंत्र चलता फिरता दवाखाना सुरू केला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन ती सोय लवकरच रत्नागिरी जिल्ह्यासाठीही करण्यात येणार आहे. यामध्ये एका मोठय़ा बसमधून डॉक्टरांचे पथक मागणीप्रमाणे जिल्हाभर फिरतील. आणि ग्रामीण भागातील रूग्णांना मोफत उपचार, औषधं उपलब्ध करून देतील, अशी माहितीश्री. गीते यांनी यावेळी दिली.

 

Story img Loader