राजकीय अस्तित्वासाठी सामाजिक अस्मिता पेटण्याचे संकेत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोकणातील कुणबी समाजाने दापोलीत आज क्रांतीचा एल्गारह्ण करत समाजाचं राजकीय आस्तित्व निर्माण करण्याची शपथ नव्याने अधोरेखित केली. यावेळी ‘मिशन २०१९’ डोळ्यासमोर ठेऊन लढाईसाठी सज्ज व्हा, असे आवाहन अनेक मान्यवरांनी केल्याने आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकांत सामाजिक अस्मितेची मशाल पुन्हा एकदा पेटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या मेळाव्याला कोकणातील पाचही जिल्ह्यातील कुणबी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
दापोलीतील जॉली क्लब मदानावर आज कुणबी समाजोन्नती संघाच्या युवक मंडळातर्फे एकजूट, आरक्षण आणि राजकारण या विषयावर कुणबी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, काँग्रेस नेते व नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, राष्ट्रवादी नेते व दापोली पंचायत समिती सभापती चंद्रकांत बकर, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदिप राजपुरे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक गोिवद जोशी तसेच कुणबी मंडळाचे शरद भावे, माधव कांबळे, दिपक गोरीवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी एकजूटीने संघर्ष करून आपले हक्क मिळवण्याची आणि राजकीय आस्तित्व सिद्ध करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी श्री. लाड यांनी सांगितले की कुणबी समाज एकजूट होऊ नये, म्हणून तीन टक्के लोकांचा आटापिटा सुरू आहे. त्यामुळेच अजून कुणबी वाडय़ांमध्ये पाणी आणि रस्त्याचेच प्रश्न कायम आहे. कोण आपल्याला वापरतोय, हे आता लक्षात घ्यायला हवे. आपण स्वतला छत्रपतींच्या कुळातील म्हणवतो, पण आज इतरांचे चाकर झालो आहोत. स्वतचे राज्य आणायचे असेल, तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, असे सांगतानाच त्यांनी समजाचा लोकप्रतिनिधीच कोणत्याही निवडणुकांत निवडून द्यायला हवा, असे आवाहन केले.
कुणबी मंडळाचे दिपक गोरीवले, माधव कांबळे यांनीही समाजाच्या मर्यादा लक्षात आणून देत राजकीय आणि सामाजिक विकासासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदिप राजपुरे यांनी सांगितले की देव्हाऱ्यात आपण तलवारी उपसलेल्या देवतांची पूजा करतो, पण प्रत्यक्षात स्वत मात्र तलवारी म्यान करून वावरतो. हा विरोधाभास लक्षात घेऊन नशीबावर नाही, तर स्वकर्तृत्वावरच स्वतला सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मात्र या राजकीय आस्तित्वाच्या मुद्द्यापेक्षा वैयक्तिक कर्तव्यांना अधिक महत्त्व दिले. मुठी आवळून प्रश्न सुटत नाहीत, मुठीमागच्या मनगटात ताकद यावी लागते. मुळात नेतृत्वाने योग्य दिशा द्यायला हवी. ध्येयापर्यंत पोचता आलं नाही, तर आंदोलनं अपयशी ठरतात. अशी आंदोलनं आणि अपयश द्रष्टय़ा समाजधुरीणांना अपेक्षित नसतात. सध्या आयुधाने संघर्ष करायची वेळ नाही. प्रत्येकाने फक्त स्वतची जबाबदारी योग्य रितीने पाळली, तरीविकासाची लढाई जिंकता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रत्नागिरीत चलता फिरता दवाखाना
- रायगड जिल्ह्यामध्ये वॉकहार्टच्या मदतीने आपण स्वतंत्र चलता फिरता दवाखाना सुरू केला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन ती सोय लवकरच रत्नागिरी जिल्ह्यासाठीही करण्यात येणार आहे. यामध्ये एका मोठय़ा बसमधून डॉक्टरांचे पथक मागणीप्रमाणे जिल्हाभर फिरतील. आणि ग्रामीण भागातील रूग्णांना मोफत उपचार, औषधं उपलब्ध करून देतील, अशी माहितीश्री. गीते यांनी यावेळी दिली.