Kurla BEST Bus Accident News : कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला असून चालकाने अलिकडेच इलेक्ट्रिक बस चालविण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. अवजड वाहने चालविण्याचा अनुभव त्याच्याकडे असताना केवळ १० दिवसांचे प्रशिक्षण देऊन गर्दीच्या वेळी इलेक्ट्रिक बस चालविण्यास दिल्याबाबत कुर्ला पोलीस बेस्ट प्रशासनाकडून माहिती मागविण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबल्याने अपघात घडल्याची माहिती हाती आली आहे.

आरोपी मोरे याला क्लच आणि गिअरची अवजड वाहने चालिवण्याचा अनुभव होता. अपघात झाला त्यावेळी त्याने क्लच समजून चुकून ॲक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढल्याची माहिती हाती आली आहे. आसपास भरपूर वर्दळ असल्यामुळे गाडी रस्त्यावर ठेवण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना उडविले आणि बसचा वेग कमी करण्यासाठी भिंतीला धडक दिली अशी माहिती तपासात समजली असून त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
Jammu Kashmir Truck Accident
Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू
two killed 13 devotees injured after tempo with devotees on somvati yatra meets with accident in Jejuri
जेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात; अपघातात दोघांचा मृत्यू, १३ भाविक जखमी

हेही वाचा >> कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

परिवहन विभागाकडून बसची तपासणी

अपघातात २१ मोटरगाड्या आणि एका हातगाडीचे नुकसान झाले आहे. न्यायवैधक तज्ज्ञांनी संबंधित मोटर गाड्यांवर लागलेल्या बसच्या रंगाचे नमुने गोळा केले असून ते परिक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, हे तपासण्यासाठी पोलीस परिवहन विभागाची मदत घेणार आहेत. परिवहन विभागाच्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे. तसंच, अपघातग्रस्त वाहनाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर सोमवारी रात्री बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. या अपघातात सात जण ठार, तर ४९ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला – अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक रस्त्यावर सैरावैरा पळू लागले. घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसचालक व वाहकाला ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले. दोघांनाही कुर्ला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी चालक मोरेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, ११८(१), ११८(२), ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोरेला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Story img Loader