राज्यभर गाजलेल्या कुश कटारिया या आठ वर्षांच्या मुलाच्या हत्याकांडातील आरोपी आयुष पुगलिया याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी गुरुवारी दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली. त्याचा भाऊ नवीन याला मात्र आरोपमुक्त करण्यात आले. हत्येमागील  हेतू सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेला नाही तसेच मृत्युदंड द्यावा असा हा ‘दुर्मिळातला दुर्मीळ’ प्रकार नाही, असेही न्यायाधीशांनी नमूद केले. कुशचे ११ ऑक्टोबर २०११ रोजी अपहरण झाले होते. चार दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला होता. कटारिया कुटुंबाला ओळखणाऱ्या आयुषनेच चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला नेले होते, असे कुशच्या सवंगडय़ांनी तपासात सांगितल्यानंतर आयुषवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. या लहान मुलांनी न्यायालयातही साक्षीदार म्हणून न घाबरता ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा