कॅसनूर जंगल आजार नियंत्रणासाठी ५५ बाधित गावांच्या अनुषंगाने औषोधोपचार, जंतुनाशक फवारणी, लसिकरण, प्रतिबंधात्मक उपाय यांचे योग्य नियोजन करावे तसेच हा आजार आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावी, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणा, पशुसंवर्धन व वन विभाग यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दोडामार्ग तालुक्यामधील कॅसनूर जंगल तापाबाबत आयोजित बठकीत ते बोलत होते. याप्रसंगी
काजू उत्पादनाच्या अनुषंगाने लोकांना जंगलात जाणे अनिर्वाय असल्यामुळे लोकांनी जंगलात जाताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेने पुरविलेल्या डी. एम. पी. तेलाचा उपयोग करणे, तसेच जंगजिल्हाधिकारी अनिल भंडारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.लातून आल्यानंतर जंतूनाशक साबणाने आंघोळ करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गुरांना जंगलात न सोडणे तसेच जंतुनाशक साबनाने गुरांनाही अंघोळ घालणे गरजेचे आहे, असे मत या वेळी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने खबदारी म्हणून दहा आरोग्य टीम तसेच तालुका पातळीवर अतिरिक्त मनुष्यबळ व एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची नेमणूक केली आहे. याशिवाय सावंतवाडी व दोडामार्ग येथील आरोग्य केंद्रात विषेश वॉर्डची स्थापना करण्यात आली असून तज्ज्ञामार्फत येथे कॅसनूर जंगल आजार झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तरी लोकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे दिसल्यास ताबडतोब आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहनही या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
लोकांमध्ये कॅसनूर जंगल आजाराबाबतच्या प्रतिबंधात्मक उपायाबाबत जागृती व्हावी याकरिता िपट्र व इलेट्रॉनिक मीडिया तसेच मोबाइल एसएमएसद्वारे जनजागृती करण्यात यावी अशी सूचना या वेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधित विभागांना केली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी मृत माकाडाच्या ५० मीटर परिघात डस्टिंग पावडर, स्प्रे, जंतुनाशक यांची फवारणी करण्यात येत असून लोकांच्या घरात व जंगलातही प्रतिबंधात्मक उपायोजना केली जात असल्याची माहिती या वेळी दिली.
याप्रसंगी राज्यस्तरीय सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, उपसंचालक आर. बी. मुगडे, मलेरिया विभागाचे सहसंचालक डॉ. खलिपे, प्र. जिल्हा शल्यचिक्सक डॉ. श्रीमती गावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चांदेल, जिल्हा वन अधिकारी रमेश कुमार आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kyasanur forest illness problem
First published on: 19-02-2016 at 01:14 IST