नांदेड : महायुती सरकारच्या काळात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून महायुतीच्या शिवशाहीत लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यातील दहशत आणि अराजकता संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेसकडून डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रावण रॅपणवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी पुरोगामी महाराष्ट्राला हदरवणारी बलात्काराची घटना राज्याच्या सांस्कृतिक शहर पुण्यात शासनाच्या शिवशाही बसमध्ये घडली आहे. एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजना राबवून राज्याची तिजोरी रिती झाली असतानाच दुसरीकडे राज्यातील लाडकी बहीण मात्र अतिशय असुरक्षित झाली आहे.

सांस्कृतिक शहर पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर बलात्कार व हल्ले करून हत्या केली जात आहे. पुण्यातील कोयता गँगसह,बीड नांदेड आदी विविध शहरात दिवसाढवळ्या खून करून दहशत माजविले जात आहे. एकंदर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. अनेक प्रकरणात शासनातील मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीकडे बोट दाखवले जात आहे.आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या जबाबदारीने राज्यातील दहशत आणि अराजकता संपवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा असा आक्रोश जनतेतून होत आहे याची आपण दखल घ्यावी. मुखेड शहर काँग्रेस कमिटी कडून पुण्याच्या शिवशाहीमधील घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे, असा मजकूर दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री व गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनावर डॉ. श्रावण रॅपणवाड, शहराध्यक्ष हनमंत नारनाळीकरसह सेवानिवृत्त नायब तहसीलदार विश्वनाथराव कोलमकर, सेवादल प्रदेश सचिव अण्णासाहेब जाहीरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, सुरेश पाटील बेळीकर, इमरान पठाण, केतन मामडे, बालाजी साबणे, विठ्ठल पंदीलवाड, बालाजी वाडेकर, सुनील पाटील आरगिळे, प्रकाश निमलवाड, विशाल गायकवाड, गौस सलगरकर, इरफान मोमीन, विद्याधर साखरे शिवाजी गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीने तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले.

Story img Loader